Home स्टोरी आजगाव – धाकोरे गावात मायनिंग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू,ग्रामस्थांचा जोरदार विरोध…!

आजगाव – धाकोरे गावात मायनिंग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू,ग्रामस्थांचा जोरदार विरोध…!

283

आजगाव प्रतिनिधी (दिनेश मयेकर): गुरुवार दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले. त्या पत्रात असे नमूद आहे की,मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी ते मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ रोजी कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे तपासणी करणार आहेत.

ग्रामपंचायतने त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. तरीही त्यांचे म्हणणे आहे आम्ही ग्राम पंचायत ची परवानगी मागायला आलो नाही फक्त सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्राम पंचायत ला कळवीत आहोत असे आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.यावरून आजगाव व धाकोरे गावात मायनिंग सुरू करण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू असल्याची यापूर्वी चर्चा होती मात्र या jsw च्या पत्राने स्पष्ट झाले आहे.मात्र स्थानिक ग्रामस्थांचा मायनिंगला जोरदार विरोध आहे.