Home स्टोरी आजगावं- धाकोरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे अभिनंदन…! अॅड नकुल पार्सेकर

आजगावं- धाकोरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे अभिनंदन…! अॅड नकुल पार्सेकर

223

सावंतवाडी प्रतिनिधी: गेल्या वीस वर्षाहून जास्त काळ या जिल्ह्यातील काही राजकीय मंडळीना हाताशी धरून मायनिंग माफियांनी या निसर्गरम्य जिल्ह्याची वाट लावली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळणे गावाची वाट लावून झाली. आता या निसर्गाची लुटमार करून येथील जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्ती नष्ट करण्यासाठी इतर गावांकडे या माफियांना आपला मोर्चा वळवला आहे. कळणे मायनिंगच्या मायनिंग विरोधी लढ्यात मी एक कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो. काही राजकीय मंडळीनी निवडणूकी साठी लागणारा पैसा या मायनिंग प्रकल्पात कमावला आणि नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असलेल्या सुंदर गावाची वाट लावली.

जागतिक स्तरावर ज्या सह्याद्रीचा पर्यावरणाच्या द्रुष्टीने गांभीर्याने विचार होतो तो सगळाचं पट्टा मायनिंग दलालांच्या खशात घालण्याचं षढयंञ गेल्या पंधरा वर्षापासून एक राजकीय नेता करत आहे. माधवराव गाडगीळ समितीच्या दौऱ्यात हा नेता त्यानां चुकीची माहिती देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. मात्र त्या दौऱ्यात मी, स्व. गोपाळराव दुखंडे,पञकार शेखर सामंत, गवस सर आदींनी हा त्या मायनिंग धार्जिण्या नेत्याचा डाव हाणून पाडला. त्या नेत्याचा माधवराव गाडगीळांनीही योग्य शब्दात समाचार घेतला होता. केसरी फणसवडे येथे मायनिंग आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या स्वतःला विकास पुरुष समजणाऱ्या नेत्याचा कुटील डाव आम्ही हाणून पाडला.

साधारण दहा बारा वर्षापूर्वी धाकोरा व आजगांव या पंचक्रोशीत मायनिंग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सर्व गावं आताच्या सारखचं एकटवल.ग्रामसभेची ताकद फार मोठी असते. जनसुनावणीच्या वेळी सगळ्यांनी विरोध केला. एवढ्यावरचं ग्रामस्थ थांबले नाही. निवृत्त न्यायाधीश मा. कोळसेपाटिल यांच्या सुचनेनुसार प्रकल्पाच्या बाजूने व विरोधात गुप्त मतदान घेण्यात आले. या प्रतिक्रियेच्या वेळी स्वतः कोळसेपाटिल, डॉ. जयेंद्र परुळेकर, स्व.गोपाळराव दुखंडे व मी सहभागी होतो. मला निश्चित आठवत नाही पण आठशेच्यावर लोकांनी मतदान मायनिंग प्रकल्पाच्या विरोधात केलं. एकुण मतदानाच्या ९९ टक्के मतदान विरोधात झालं. ही ग्रामस्थांच्या एकजुटीची ताकद त्यामुळे तेव्हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला. आता हे मायनिंगचं भुत पुन्हा डोकं वर काढत आहे. या भुताला कायमचं गाडण्यासाठी त्या भागातील सजग ग्रामस्थांनी एकमताने ठराव करुन विरोध केला याबद्दल समस्त ग्रामस्थांचे, सरपंच सौ. सौदागर, मळेवाडचे सरपंच श्री हेमंत मराठे आदी पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.

आता निवडणूक जवळ आलेली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे साखर पेरणी करून हा प्रकल्प कसा योग्य आहे? याच्या माध्यमातून रोजगार कसा मिळणार अशी दिशाभूल करण्याचा नेहमी प्रमाणे प्रयत्न होईल तरी आपलं गावं वाचवण्यासाठी जरा सुध्दा विचलीत न होता मायनिंग दलालांचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत.