Home स्टोरी आचरा येथील सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांचा ठाकरे...

आचरा येथील सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांचा ठाकरे गटात प्रवेश….

158

आचरा:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या सह अनेकांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख संदेश पारकर तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. आचरा येथील हॉटेल सी रॉक सभागृह येथे संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मालवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, युवती सेना सदस्य, युवासैनिक व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पुष्पहार अर्पण केला व सर्वांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक विनायक परब यांनी प्रास्ताविक तर उदय दुखंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना विनायक परब यांनी आता आचरा गांवात शिवसेनेने अनेकांच्या मनसुब्यांना भगदाड पाडले असे सांगितले. उदय दुखंडे म्हणाले की आचरा ग्रामपंचायत निवडणु हकीच्या पार्श्वभूमीवर १३ ही सदस्य व सरपंच शिवसेनेचेच असणार आहेत.

जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी संबोधीत करताना सांगितले की आचरा हे ऐतिहासिक परंपरेचे गांव असून ते अबाधीत राखणे ही गरज आहे. या आचरा ग्रामपंचायत निवडणूकीत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवणे हेच शिवसेनेचे काम असेल. आता मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या मागिल दोन टर्मनंतर आता हॅटट्रीक साधण्याची संधी आहे. आचर्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्रीत पणे मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले ही प्रशंसेची गोष्ट आहे. आता लवकरच आमदार वैभव नाईक हे कॅबिनेट मंत्री असतील असाही विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला व सांगितले की राज्यातील सर्व धर्मीयांची शिवसेनेला व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पाठिंबा आहे. भाजप, मोदी व शहा यांना लोक कंटाळले असून संविधान वाचवण्यासाठी शिवसेनेला जनता नक्कीच कौल देणार हे स्पष्ट आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही आमदार शिवसेनेचेच असतील व ५ नोव्हेंबरच्या आचरा ग्रामपंचायत निवडणूकी नंतर १३ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच शिवसेना व मविआ चाच असेल. आमदार वैभव नाईक यांच्या लोकांच्या प्रती असलेल्या संवेदना हीच तर शिवसेनेची संवेदना. शिवसेनेचे नेतृत्व हे एकात्मतेसाठी, न्यायासाठी असणारे हिंदुत्व आहे असे संदेश पारकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, विभाग प्रमुख समीर लब्दे, उदय दुखंडे, नारायण कुबल, गणेश तोंडवळकर, दिलीप कावले, समीर हडकर, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत, ज्येष्ठ शिवसैनिक श्याम घाडी, पप्पू परुळेकर, युवा सेना विभाग प्रमुख नितीन घाडी, संकेत पाटील युवासेना विभाग प्रमुख, बाबू मिराशी, विनायक परब, राजू नार्वेकर, आबा सावंत, प्रसाद टोपले, चंदन पांगे, भाई कासवकर, श्रीकांत बागवे, महिला आघाडी प्रमुख, अनुष्का गांवकर, मालवण महिला आघाडीच्या शिंदे, मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, माजी पं. स. सदस्य निधी मुणगेकर, तळाशीलचे संजय केळुसकर, अरूण लाड, समीर हडकर, सचिन परब, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण , सन्मेष उर्फ राजू परब, मालवण शहर युवा सेना प्रमुख उमेश चव्हाण, दीपक देसाई, मनोज मोंडकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.