Home स्टोरी आकेरी येथील वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात.

आकेरी येथील वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात.

247

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी बाहेरचावाडा येथे आकेरी गावातील नामदेव तोरस्कर ही वृद्ध व्यक्ती काल दुपारी बारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंतर रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडून होती. काही जणांचा समज झाला होता की दारूच्या नशेत सदर व्यक्ती पडली असेल, परंतु सदर वृद्ध व्यक्ती फिट येऊन पडली होती. याची कल्पना सायंकाळी इम्तियाज राजगुरू यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना दिली असता त्यांनी त्या ठिकाणी तत्काळ धाव घेऊन सदर व्यक्तीला प्राथमिक उपचार करून शुद्धीवर आणून त्यांच नाव व गाव विचारलं असता आपण आकेरी येथील असल्याचे सांगितले व आपण कामावर जात असताना फिट आली व आपण येथे पडलो असं ते शुद्धीत आल्यानंतर म्हणाले. सदर व्यक्तीच्या हाता पायाला मार लागला होता व तो वृद्ध व्यक्ती पावसामध्ये चिंब भिजला होता . बोलायला सुद्धा ताकद नव्हती. सदर व्यक्तीला पाणी पाजून पूर्णपणे शुद्धीत आणलं व तशी कल्पना सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बिट हवालदार पि.के कदम यांना दिली असता त्यांनी लगेच पोलिस अनिल धुरी व डिसोजा यांना घटनास्थळी पाठविले.

पोलीस धुरी यांनी सदर व्यक्तीला गाडीमध्ये बसवून आकेरीं येथे त्यांच्या राहत्या घरी सुखरूप सोडून आल्यावर सदर व्यक्ती चांगल्या घराण्यातला असल्याची माहिती पोलिसांनी सामाजिक बांधिलकीला दिली. सदर वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी हि सामाजिक बांधिलकीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. यासाठी विशेष सहकार्य विशाल नाईक,  कादरभाई व आजान नाईक यांचे लाभले.