कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): बालपणीच मातृत्वाची छत्र छाया हरपली असली तरीही आपल्या जन्मदात्या आईचे कायम स्मरण ठेवणारे संतोषनगर प्रभाग क्र. ८८ चे माजी नगरसेवक आणि कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या मातोश्री, स्वर्गिय गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या २३ व्या स्मृती दिनी श्रीमलंग पट्टयातील खरड या आदिवासी भागातील आदिवासी पाड्यांवर वास्तव्यास असलेल्या अनेक माता भगिनींना साड्या तसेच अन्न धान्याचे वाटप करून आपल्या ‘आई ‘ च्या पुण्य स्मरणांस नमन केले. बालपणीच मातृत्वापासुन वंचित झालेले महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या आईचे स्मरण कायम स्वरूपी नजरे समोर रहावे या साठी आईच्या स्मरणार्थ इ .स . २०१५ साली संतोष नगर प्रभागाच्या प्रवेश द्वारावर ‘मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड प्रवेशद्वार ‘ या नावाचे भव्य प्रवेश द्वार निर्माण केले आहे. त्याच बरोबर आपल्या कार्यालया समोरच्या चौकासही ‘मातोश्री गुंजाई चौक ‘ असे नांव देवून या चौकात आईच्या स्मरणार्थ प्रतिकात्मक स्वरूपात आपल्या बाळाला मायेने आकाशात उंचावणाऱ्या मातासम महिलेचा पुर्णाकृती पुतळा स्थापन केला आहे . हा पुतळा पुणे लिंक रोड साठी सद्या लॅन्ड मार्क ठरला आहे .
आपल्या आईच्या स्मरणार्थ खरड येथील आदिवासी पाड्यांवर साड्या तसेच अन्नधान्यांचे वाटप केले. तसेच आपल्या जनसंपर्क कार्यालयात काही दिव्यांगांना तिन चाकी सायकल आईच्या स्मरणार्थ देवून त्यांनी आपल्या आई प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या समयी शाखा प्रमुख प्रशांत बोटे, निलेश रसाळ यांचे सह अशोक म्हात्रे, रोशन पाटील, वसंत म्हात्रे, सुभाष गायकर, पप्पू भाई, रवि पाटील तसेच ग्रामस्त मान्यवर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.