Home क्राईम आंबोली येथे १ लाख ८ हजार रुपयांची गोवा बनवटीची दारु जप्त!

आंबोली येथे १ लाख ८ हजार रुपयांची गोवा बनवटीची दारु जप्त!

58

सावंतवाडी वार्ताहर: शिमगोत्सव सणाच्या दरम्यान सध्या महाराष्ट्रात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक छुप्या पद्धतीने जोरात सुरु आहे. त्यामुळेसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.आज सकाळी गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १ लाख ८ हजार रुपयांची गोवा बनवटीची दारु जप्त केली आहे. अवैध दारू वाहतूक प्रकरणी कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी वय ३६, रा. अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली.