Home स्टोरी आंबोली नांगरतास शाळेचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

आंबोली नांगरतास शाळेचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

124

सावंतवाडी प्रतिनिधी: शिक्षक आणि पालक ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून आंबोली नांगरतास शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. अशा एकोप्यातूनच गावाचा विकास शक्य असुन या शाळेचे पालक, ग्रामस्थ आणि विशेषतः शिक्षक कौतुकास पात्र आहेत. असे प्रतिपादन आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केले. आंबोली नांगरतास शाळेच्या गुणगौरव सोहळ्यात सावित्री पालेकर बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर आंबोली केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पडवळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालेकर, भिसाजी गावडे, शाहू खरात, अनंत घोगळे, संतोष कोटूळे, संतोष पडवळ, अंजली घोगळे, सुप्रिया पडवळ, संदेश खरात, संतोष गावडे, शाहू लांबोर, गुंडू राऊत, विष्णू कालेलकर, रविंद्र चव्हाण, सुभाष पालेकर, शोभा पाताडे, रूपाली घोगळे, लक्ष्मण पटकारे, मनोज खरुडे, दशरथ काळे, नरेश जंगले, सिधू यमकर, विठ्ठल पटकारे, भारती गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        यावेळी नवोदय विद्यालयात निवड झालेले शाळेचे विद्यार्थी इशिता घुले व काशिषराजे पालेकर या विद्यार्थ्यांचातसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान झाला. यावेळी आंतरजिल्हा बदली झालेले शाळेतील शिक्षक युवराज तिप्पे, विद्याताई पाटील, तुलसीराम घुले यांचाही गौरव करण्यात आला. तसेच या शाळेत नव्याने हजर झालेले शिक्षक अमोल कोळी, संगीता गुडूळकर, सागर पाटील, रुपाली जावळे यांचे स्वागत करण्यात आले.

          यावेळी केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांनी वृक्षारोपण करून शाळेसाठी स्वछता मॉनिटर यांची नेमणूक केली. त्यांनतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे औपचारिक उदघाटन करुन याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.