२० जून वार्ता: आंबोली घाटात मुख्य दरडीच्या खालील बाजुस दोनशे फूट खोल दरीत मृतदेह आढळला होता. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास आंबोली रेस्कू टीमच्या मदतीने आंबोली पोलीसांनी दरीतून मृतदेह वर काढला पाळी आंबोली रेस्कू टिमचे सदस्य ग्रामस्थ, आबोली पोलीस, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उप निरीक्षक, हवालदार यावेळी हजर होते. मृतदेह वर काढल्या नंतर तो तपासण्यात आला यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याच्या खुणा दिसत होत्या तसेच मृतदेह उन्हातच असल्याने हाताची आणि पायाची चामडी निघाली होती. चेहरा काळपट पडला होता. सदर व्यक्तीचे वय साधारण पस्तीस ते चाळीस वर्षे असणार असा अंदाज आहे. मृतदेह परप्रांतीय कामगाराचा असल्याचा अंदाज त्याच्या कपड्यावरून दिसून येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच त्याचा मृत्यू कसा झाला समजू शकेल असा अंदाज आहे. या घटनेमुळे आंबोली पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीये. या प्रकरणात नेमकं त्या व्यक्तीसोबत काय झालं? की घातपात झाला असण्याची यता नाकारता येत नाही