Home स्टोरी आंबोली घाटात आयशर आणि बसमध्ये अपघात.

आंबोली घाटात आयशर आणि बसमध्ये अपघात.

273

१४ जून वार्ता: आंबोली घाटात एका वळणावर आयशर आणि बसमध्ये समोरासमोर अपघात झाला आहे. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले आहेत. अपघात झालेल्या दोन्ही गाड्यांना बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात झालेल्या बसच्या मागून येणाऱ्या चार चाकी आयटेन गाडी धडल्याने चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती हवालदार दत्ता देसाई यांनी दिली आहे.