Home क्राईम अवैद्यरीत्या पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या विरुद्ध सावंतवाडी वन विभागाची...

अवैद्यरीत्या पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या विरुद्ध सावंतवाडी वन विभागाची कारवाई…..

571

सावंतवाडी सावंतवाडी: 

 

आज सकाळी सावंतवाडी मधील माठेवाड रोड, बाहेरचा वाडा येथे रहाणाऱ्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्यावर अवैद्यरीत्या पोपट व शेकरू यांना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवल्यामुळे सावंतवाडी वन विभागाकडुन कारवाई करण्यात आली.

याचा सविस्तर वृत्तांत असा की, सावंतवाडी मधील बाहेरचावाडा येथे एका इसमाने अवैद्यरीत्या संरक्षित प्राणी ताब्यामध्ये ठेवले असलेबाबत गुप्त बातमी वन विभागाला मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सकाळी सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर हे आपल्या गस्ती पथकासह संबंधित इसमाच्या घरावर छापा मारण्यासाठी गेले असता, त्या संशयित इसमाच्या घरच्या मागच्या बाजूला पोपट व शेकरू हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये संरक्षित प्राणी, त्याने पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव कैस अब्दुल लतीफ बेग असल्याचे व आपणच या प्राण्यांना बंदिस्त करून ठेवले असल्याचे मान्य केले. त्या अनुषंगाने वन्यप्राणी व सदर इसमास चौकशीसाठी वनविभागाच्या टीमने ताब्यात घेतले.

सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी मा.नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद राणे, प्रमोद जगताप, पोलिस कॉन्स्टेबल गौरेश राणे, वनरक्षक महादेव गेजगे, दत्तात्रय शिंदे, प्रकाश रानगिरे, सागर भोजने, वैशाली वाघमारे, वाहन चालक नितीन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.