Home राजकारण अवकाळी पाऊस, कर्मचाऱ्यांचा संप याबाबत सरकारला गांभीर्य आहे की नाही?- अजित पवार

अवकाळी पाऊस, कर्मचाऱ्यांचा संप याबाबत सरकारला गांभीर्य आहे की नाही?- अजित पवार

53

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आज अधिवेशनात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक झाले. आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. टोपलीत द्राक्ष आणि कांदे घेऊन अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी विरोधकांनी केली. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.

विरोधी पक्ष नेते अजित पवार

विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, गारपिटीमुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे करायलाही कुणी नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या भावनेने ताबडतोब नोकरीला यावे, पंचनामे करावे, असे आवाहन अजित पवारांनी केले. वादळी पावसामुळे मराठवाड्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. १०० च्या आसपास पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कर्मचारीही संपावर आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. असं अजित पवार म्हणाले . तसेच अवकाळी पाऊस, कर्मचाऱ्यांचा संप याबाबत सरकारला गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.