Home राजकारण अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका .

80

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख करत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले. नितेश राणे बुधवार दि. १ मार्च रोजी राऊतांनी विधिमंडळावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना सभागृहात बोलत होते.संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, “संजय राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे? ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहिलेलं.बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही….बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं संजय राऊतांनी लिहिलं होतं. राऊतांना दिलेलं संरक्षण काढा. ते पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेलं संरक्षण आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं. तसेच आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे, असा सवालही राणेंनी केला.संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही….त्यांनी मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचं १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असं वक्तव्य राणेंनी केलं.