Home स्टोरी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक!

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक!

72

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याकडे माझे वडील अनिल जयसिंघानी यांना सोडवा अशी मागणी केली. त्यासाठी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. ही अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. एवढंच नाही तर अनिक्षाने व्हिडीओ आणि फोटो दाखवून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी विधासभेत दिली होती. या प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.