कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी? अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे सरकार समर्थन करत आहे आणि शिंदे फडणवीस सरकारने जो शेतकऱ्यांच्या बाबतीत अर्थसंकल्प सादर केला तो फक्त विषाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि एक प्रकारे अब्दुल सत्तारांची पाठ राखण करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे समर्थन केले आहे. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य देशातील तमाम शेतकऱ्याचा अपमान करणार आहे. या सभागृहामध्ये अब्दुल सत्तारांनी माफी मागावी. महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषिमंत्री पदावरून अब्दुल सत्तारांची हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली. तसेच प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रचंड नैराश्य आहे आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय सरकार घेताना दिसत नाही. शेतकऱ्याला कळतेय की, मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तुर उत्पादक शेतकरी, ऊस, हरभरा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पाना पुसण्याचा पाप या सरकारने केले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झालेली असताना थातूरमातूर अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला नाव जरी त्याला पंचामृत दिले असेल मात्र तो प्रत्यक्षात विषयाचा घोट आहे. या शब्दांत अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.