Home Uncategorized अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे महाअअभिषेक संपन्न.

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे महाअअभिषेक संपन्न.

300

सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे मनसे विद्यार्थी सेना यांच्या वतीने महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष केतन उदय सावंत यांच्या माध्यमातून हिरण्यकेशी येथे महाअभिषेक पार पडला.तसेच यावेळी आलेल्या भक्तांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई देखील वाटण्यात आली.यावेळी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर,आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, महाराष्ट्र सैनिक प्रतीक मालवणकर रोहित जाधव ज्ञानेश्वर कांबळे ओमकार जाधव विघ्नेश गावडे साहिल जाधव यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.