Home राजकारण अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार १०० टक्के होणार! शिक्षण मंत्री दिपक केसरकर

अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार १०० टक्के होणार! शिक्षण मंत्री दिपक केसरकर

86

२६ मे वार्ता: अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार १०० टक्के होणार आहे. मंत्रीपद वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, अशी माहिती शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. यावेळी केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचं सूत्रंही सांगितलं. किती जागा लढवायच्या, किती मागायच्या हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे. एखाद्या निवडणुकीचे तयारी करतो तेव्हा राष्ट्रीय नेते एकत्र येतात. लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्यांनी सुरू केली आहे. २२ जागा मागितल्या बाबत प्रवक्ता म्हणून मी एकदाही बोललो नाही, असं दिपक केसरकर यांनी सांगितले. तसेच भाजप आणि आमचं जागा वाटपाचं सूत्र पूर्वीपासून ठरलेलं आहे. लोकसभेसाठी भाजप नेहमीच जास्त जागा घेत आलेला आहे. कारण ते केंद्रात असतात. शिवसेना राज्यात काम करते. पण आमच्या वाटेला ज्या जागा नेहमी येतात. त्याबद्दल आम्ही तयारी केली तर चुकीचे काय आहे? असा प्रश्न हि त्यांनी उपस्थित केला.