Home शिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे मेडिकल क्षेत्रातील नीट परीक्षा आज संपन्न

अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे मेडिकल क्षेत्रातील नीट परीक्षा आज संपन्न

71

सावंतवाडी प्रतिनिधी: संपूर्ण देशभरात अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे मेडिकल क्षेत्रातील नीट परीक्षा आज घेण्यात आली. या नीट परीक्षेला देशभरातून जवळपास २४ लाख विद्यार्थी बसले होते. यावेळी तेरा लाख विद्यार्थी हे तर अकरा लाख विद्यार्थी हे रिपीटर बसले होते. असे एकूण २४ लाख विद्यार्थी यावेळी नीट परीक्षेला बसले आहेत. संपूर्ण देशभरात प्रत्येक राज्यात जिल्हा निहाय परीक्षा घेण्यात आली. दुपारी दोन ते पाच या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कुडाळ या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली. जवळपास दोन हजाराहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसले आहेत. सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी तर कुडाळ हायस्कूल या ठिकाणी ही परीक्षा झाली सकाळी अकरा वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत नीट परीक्षा पार पडली.