Home राजकारण अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत! आमदार गोपीचंद पडळकर यांचं...

अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत! आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य….

173

२४ सप्टेंबर वार्ता:  दोन दिवसांपूर्वी युती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच थेट निशाणा साधलाय. अजित पवार यांची आमच्या प्रतिची भावना स्वच्छ नाही. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना मानत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला.  गोपीचंद पडळकर यांच्या टिकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.

 हा असं म्हणाला तो तसं म्हणाला. याला उत्तर देणं माझं काम नाही. हल्ली वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यांकडे मी लक्ष देत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.