Home राजकारण अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं…

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं…

57

मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निकाल आलाय, त्याबाबत सरकारनं त्यांच्या विधी व न्याय खात्याला तज्ज्ञ लोकांना, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन यावर तातडीनं काय करता येईल यावर विचार केला पाहिजे, असं अजित पवार यांनी नमूद केलं.

कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असं स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्ही बोलल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडतायत, असा सवाल त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत असं म्हणत टोलाही लगावला. “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं? मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांच्या पत्रावर भाष्य

खारघरसंदर्भात मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. सरकारनं त्यात मृतांचा आकडा घोषित केला आहे. निश्चित आकडा मिळत नाही. परंतु काही लोक दबक्या आवाजात त्या उष्माघातात तिकडे काही लोकांना काही गोष्टी मिळाल्या नाही असं म्हणतात. मी पोस्टमार्टमचा रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मागवला आहे. पण काही म्हणतात जी संख्या सांगितली जातात त्यात तफावत आहे असं म्हणतात, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून यावेळी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी सर्व टीम तिकडे राबत होती. राज्याचे प्रमुखही तिकडे जात होते. असं असतानाही तिकडे लोकांना पाणी का मिळालं नाही अशी ऐकव बातमी आहे. सर्व गंभीर बाब आहे, म्हणून मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केली.

तेव्हा भूमिका स्पष्ट करू…

फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्यात जिल्हापरिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार होत्या. तेव्हा अनेक इच्छुकांनी निरनिराळ्या पद्धतीनं आपलं मार्केटिंग केलं, जाहिरातबाजी केली, कामं केली, देवदर्शनं केली, झाली का निवडणूक? आता ते बिचारे कंटाळून गेले केव्हा निवडणूक लागते हा विचार करून. त्यामुळे जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा बसू, चर्चा करू, महाविकास आघाडीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, मागच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मविआच्या घटकपक्षांचे किती नगरसेवक आले हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.