Home राजकारण अजित पवार यांच्या मुख्यमंत्री इच्छेवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया…

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री इच्छेवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया…

110

जळगाव : अजित पवार हे भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही, राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी या विचारही केला असावा. अजित दादा यांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा अजित दादा हे भाजपासोबत गेले नव्हते तर ते राष्ट्रवादीतच होते. ईडी किंवा इतक कोणत्या भितीला ते घाबरणारे नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केले तर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचेही त्यांनी एक पोस्ट केली यावर बोलताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्री का असू नये, वर्षांनुवर्ष कष्ट करतोय त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री आपण होणार असल्याचं म्हटलंय यात गैर काय? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणत्या आकड्याचा खेळ होता हा तर खोक्यांचा खेळ जमला असल्याची खोचकी टीकाही त्यांनी केली.जो १४५ चा आकडा पूर्ण करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. कदाचित अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याचा १४५ चा आकडा जमवू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर सध्या राजकारणात काही घडू शकतं. त्यामुळे पुढच्या कालखंडात या राज्याचे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असेही त्यांनी म्हटले.