Home राजकारण अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे! रामदास...

अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे! रामदास आठवले

44

भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्चला निधन झाले. त्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही, कधी होणार, यावरून चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, याच विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमचा कोणताही उमेदवार देणार नाही, पण भाजप जो उमेदवार देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्चला निधन झालं
विरोधी पक्ष नेते अजित पवार

अजित दादांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जरी व्यक्त केली, तरी त्यांना महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री होता येणार नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे आणि आमच्या सोबत युती सोबत, NDA सोबत आले तर भविष्य काळात त्यांचा विचार होईल, असे देखील रामदास आठवले म्हणाले.