Home स्टोरी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १६ ते २२ जून २०२३ रोजी होणार!

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १६ ते २२ जून २०२३ रोजी होणार!

197

१४ जून वार्ता: हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ अर्थात् एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यंदाच्या वर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत श्री विद्याधिराज सभागृह, श्री रामनाथ देवस्थान, बांदोडा, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या हिंदु अधिवेशनांना आपण दिलेल्या प्रसिद्धीविषयी आम्ही आपले आभारी आहोत. आजवर झालेल्या दहा अधिवेशनांना प्रत्येक वर्षी मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. या अधिवेशनांतून २५ राज्यांतून ३०० हून अधिक हिंदु संघटना संघटित झाल्या आहेत. या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, विचारवंत आदी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

आजही प्रतिवर्षी लाखो हिंदूंचे फसवून धर्मांतर केले जात आहे. काश्मिरसह देशभरात हिंदूंना वेचून मारले जात आहे, तर ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून एका श्रद्धाचे ३५ तुकडेच नव्हे, तर शेकडो श्रद्धांना ‘दफन’ करण्यात येत आहे. कधी कलास्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपट, मालिका, वेब सीरिज आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवली जाते, तर भारतीय अर्थव्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी ‘हलाल अर्थव्यवस्था’ उभी करून हिंदूंना हलाल खाद्यपदार्थ घेण्यास बाध्य केले जाते. ‘श्रीरामचरितमानस’सारख्या ग्रंथाला ‘बकवास’ म्हणत हिंदूंच्या धर्मग्रंथांचे दहन केले जाते आहे, तर हिंदूंच्या मंदिरांना आणि प्रथा-परंपरा यांना सातत्याने लक्ष्य केले जाते. यातच देशद्रोही आणि फुटीरतावादी चळवळीला पेव फुटले आहे.

अशा सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हा एकमेव उपाय आहे!

संविधानिकदृष्ट्या ‘भारत हे हिंदु राष्ट्र व्हावे’, ‘हिंदु राष्ट्र संसद’ या सूत्रांसह विविध विषयांवर ‘पॅनल डिस्कशन’, ‘मुलाखती’, गटचर्चा आदींद्वारे समान कृती कार्यक्रम निश्चित करणे आणि हिंदुहिताचे ठराव संमत करणे, हे या अधिवेशनाचे स्वरूप असेल. हे कार्य समाजापर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. केवळ आपल्या सहकार्यानेच हे होऊ शकेल. या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ अर्थात् एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे प्रसिद्धीपत्रक, लेख, व्हीडीओ बाईट यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी आपल्याला विनंती आहे.

आपला नम्र,प्रा. महावीर श्री श्रीमाळ,आयोजक, ‘एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, गोवा.(संपर्क क्र.: 7738233333)