Home स्टोरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार

62

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुण्यातील साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीतील औदुंबर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळ निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने औदुंबर आणि अमळनेर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर सर्व संमतीने मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली. मग महामंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अमळनेर साने गुरुजी यांची कर्मभूमी

अमळनेर साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. साने गुरुजींनी शाळेत शिकवत असताना “विद्यार्थी” नावाचे एक मासिक प्रकाशित केले जे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या या कर्मभूमीत हे संमेलन १९५० च्या दशकानंतर पाहिल्यांदा होणार आहे. अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलेल आणि संमेलनही नक्कीच यशस्वी होईल, असे अमळनेर, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.