ओटवणे प्रतिनिधी:
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका महिला सेलने दिव्यांग मुलींना जीवनावश्यक वस्तूंसह रोख आर्थिक मदत करून त्यांच्यासोबत आगळावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुका महिला सेलच्यावतीने इन्सुली येथील ए एस एस आय एस आय संचालित संस्थेमधील दिव्यांग मुलींना आवश्यक कपडे, शाम्पू, केसाचे तेल बॉटल, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तू देऊन रोख ५००० रुपयाची आर्थिक केली. तसेच माडखोल येथील अर्धांगवायूग्रस्त मुलगी सुप्रिया लिंगोजी राऊळ हिलाही ३५०० आर्थिक मदत देऊन अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारणी सदस्या मृगाली पालव, जिल्हा महिला सेल सचिव सिमा पंडित, जिल्हा कार्यकारणी सदस्या श्रावणी सावंत, सावंतवाडी महिला सेलच्या अध्यक्षा वंदना सावंत, सचिव तेजस्विता वेंगुर्लेकर, सावंतवाडी महिला सेलच्या माजी अध्यक्षा नेहा सावंत, ऐश्वर्या सावंत, मनाली कोरगावकर, वर्षा गावडे, श्रीम. पेडणेकर तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ संयुक्त चिटणीस म. ल.देसाई, सुभाष सावंत आदी उपस्थित होते.