Home स्टोरी अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

82

मसूरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थांची भक्ती स्वामी भक्तांसाठी खूप मोलाचे असते. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लोकहिताची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अवतार कार्याची माहिती ही सर्वश्रुत आहेच. मीही एक निस्सीम श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. या धरतीवर स्वामी भक्तीच्या आश्रयातून व गोव्याच्या मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपणही लोक हिताची कामे स्वामी सेवा समजून करीत आहोत. या कार्यास श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. त्यामुळे माझ्या या कार्यातच स्वामी व स्वामी दर्शनातच माझ्या जीवनाचे हितार्थ असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

नुकतेच त्यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, पी.आय.जितेंद्र कोळी, चंद्रकांत पुजारी, बाळा शिंदे, नन्नू कोरबू, रजाक सय्यद, युवा अध्यक्ष ऋषिकेश लोणारी, शिवशरण अचलेर, पंचप्पा म्हेत्रे, धनराज शिंदे, गजानन शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व स्वामीभक्त उपस्थित होते.