परंपरेप्रमाणे इंगळे परिवाराकडून वीणा सप्ताहास प्रारंभ.
अक्कलकोट प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता झाली. या नामवीणा सप्ताहाचा शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष / नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी वटवृक्ष मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीणापूजन मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. तदनंतर मंदार महाराजांच्या हस्ते प्रथमेश इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व असून सतत ७ रात्र आणि दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवणेची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. श्रद्धेय भक्ती भावाने स्वामी भक्त या सेवेत सहभागी होत असतात. या वीणा सप्ताहात इच्छूक भाविकांना १ तास वीणा हाती घेण्याची स्वामी सेवेची संधी देण्यात येते. इंगळे परिवाराच्या वतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही चौथी पिढी आहे. या पुढील सात दिवस या नामवीणा सप्ताहात अनेक भाविक सहभागी होवून श्रींच्या चरणी सेवा अर्पण करतात. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी रोजी सकाळी ७ वाजता या वीणा सप्ताहाची समाप्ती होते.
याप्रसंगी मंदिर समिती सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, इरपा हिंडोळे, कौशल्या जाजू, प्रदीप हिंडोळे, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, अमर पाटील, बाबा सुरवसे, दर्शन घाटगे, राजू हिप्परगी, अक्षय सरदेशमुख, बाबर, निर्मलाताई हिंडोळे, सुरेखा तेली, स्वाती गंभीरे, भंडारे, प्रसाद सोनार, बाळासाहेब घाटगे, प्रसन्न हत्ते, नागनाथ गुंजले, गिरीश पवार, संजय पवार, संतोष पराणे, ऋषिकेश लोणारी, विश्वास शिंदे, सचिन हन्नूरे, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.