Home स्टोरी अँड. श्यामराव सावंत यांना पितृशोक.

अँड. श्यामराव सावंत यांना पितृशोक.

132

सावंतवाडी प्रतिनिधी: माजगाव येथील एन आर सावंत (८९) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आज दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते माजगावचे माजी उपसरपंच होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंब यांचे सांत्वन केले दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक गोपाळ सावंत, अँड. शामराव सावंत, पुणे येथील कामगार न्यायालयाचे अँड प्रताप सावंत, सावंतवाडी येथील आर पी डी कॉलेजच्या प्रा सौ रमा सावंत – घोरपडे यांचे ते सासरे, तर लांजा कॉलेजचे ग्रंथपाल कमलाकर सावंत यांचे ते काका होत.